¡Sorpréndeme!

Lokmat International News | बापरे ! इथे पडतोय चक्क काळा बर्फ | जगातील अजब घटना | Lokmat News

2021-09-13 2 Dailymotion

कझाकस्तानमध्ये थंडीमुळे लोकांना हुडहुडी भरली आहे, मात्र येथे एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. कझाकस्तान मधील टिमरटाओ शहरात काळा बर्फ पडत असल्याने नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत.टिमरटाओ शहरात हिवाळ्यात थंडीमुळे बर्फ पडतो. या बर्फाचा रंग हा नेहमी पांढरा असतो, मात्र यंदाच्या वर्षी पडलेल्या बर्फाचा रंग कोळश्यासारखा काळा असल्याचे निदर्शनास आले आहे. काळा बर्फ पडत असल्याने नागरिकांना प्रशासनाला धारेवर धरले आहे. दरम्यान याबाबत तपास करण्यासाठी शास्त्रज्ञांचे एक पथक याठिकाणी रवाना झाले आहे. यामागे वाढते प्रदूषण कारणीभूत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. या भागात देशातील सर्वात मोठी स्टील प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामधून होणाऱ्या प्रदूषणामुळे बर्फाचा रंग बदलल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews